नेपचुन ग्रह (The Effects Of Neptune)

तुम्ही बघितलं असेल तर नवरा बायकोच्या जोड्या जमताना देखिल असे अनुभव बघायला मिळतात कि क्षणार्धात नवरा बायको एकमेकांना आवडु लागतात आणि त्यांचे संसार अतिशय सुखी होतात.

Find Best Astrologer In Pune

नमस्कार मित्रांनो.

आज मी तुम्हाला नेपचुन या ग्रहाचे काही अलौकीक परिणाम सांगणार आहे.
नेपचुन हा ग्रह मूख्यतः आपल्या अंतर्मनात दडलेल्या ज्या काही आठवणी , संवेदना दडलेल्या असतील त्यांचा कारक आहे. त्या आठवणी म्हणा किंवा काही पूर्वजन्मीचे काही अनुभव किंवा आणखी तुमच्या मनात काही दडलं असेल तर क्वचित प्रसंगी ते बाहेर येत किंवा त्याचे अस्फुट असे परिणाम बघायला मिळतात.
जसे तुम्हाला आठवत असेल तर काही लोकांबरोबर तुमची मैत्री अगदी गाढ होते. दोन तीन दिवसातच तो तुमचा कैकजन्मीचा मित्र आहे अशी भावना यायला लागते. त्याचप्रमाणे तुम्ही बघितलं असेल तर नवरा बायकोच्या जोड्या जमताना देखिल असे अनुभव बघायला मिळतात कि क्षणार्धात नवरा बायको एकमेकांना आवडु लागतात आणि त्यांचे संसार अतिशय सुखी होतात.
त्याचबरोबर एखादा उलटा अनुभव येतो काही वेळेला एखादा अनोळखी माणुससुद्धा आपल्या समोर आला की आपल्या डोक्यात रागाची तिडिक जाते. तो माणुस कुठल्याही परिस्थितीत आपल्या समोर नको वाटतो. तर हे सगळं काय असतं व हे सगळ का होते तर याचा मुख्य कारक हा नेपचुन आहे.
आता नेपचुन काय करतो हे पाहु. नेपचुन हा मुख्यतः तुमच्या गतजन्मीच्या आणि या जन्मीच्या मधली जी खोल दरी आहे त्याचा मालक हा नेपचुन आहे. तुमच्या मागच्या जन्मीच्या ज्या काही आठवणी आहेत किंवा जे मागच्या जन्मीचे प्रसंग असतात ते अत्यंत पुसट स्वरुपात अंतर्मनात खोल असे रेकाॅर्ड राहतात.
तुमच्या आत्म्याबरोबर एक सुक्ष्म बुद्धि कायम वास करत असते. त्या सुक्ष्म बुद्धिमधे या सर्व गोष्टी रेकाॅर्ड केलेल्या असतात. त्या सुक्ष्म बुद्धिचा कारक हा नेपचुन आहे.
तर नेपचुन काय करतो समजा तुमच एखाद्या माणसाशी हाडवैर असेल आणि तुमचा मृत्यु झाला आणि या जन्मी तो माणुस तुमच्यासमोर काही कारणाने आला आणि तुमच्या त्या संवेदना जाग्या झाल्या तर तुम्हाला तो माणुस एक क्षणभरही डोळ्यासमोर नको वाटतो.

तसेच एखादा माणुस गतजन्मी भाजुन मेला असेल तर त्या माणसास आगीची खुप जास्त भिती वाटते. आपल्याला एखाद्या माणसाला मांजराची किळस का वाटते किंवा पाण्याची खुप भिती वाटते , एखाद्या माणसाला न्युनगंड का वाटतो याचं कारण केवळ आणि केवळ हा नेपचुन आहे. मित्रांनो हा नेपचुन ज्याप्रमाणे काही वाईट गोष्टी दाखवतो त्याप्रमाणे चांगल्या गोष्टी देखिल दाखवतो. जसे तुमचा गतजन्मीचा चांगला मित्र असेल किंवा जवळचा एखादा नातेवाईक असेल तर तो याही याही जन्मी तुमच्या मनामधे ओढ निर्माण करतो.त्याचप्रमाणे काही गोष्टी या तुम्हाला आधीच कळत असतात. जसे एखाद्या गोष्टीचा अनुभव घेत असताना तुम्हाला जाणवत असत की हे मी आधीच अनुभवल आहे. ज्याला इंग्लिशमधे Dejavu म्हणतात. या गोष्टीचा अनुभव देखिल हा नेपचुनच देतो.
असा हा अंतरंगावर राज्य करणारा आणि आपल्याला अतर्क्य अनुभव देणारा नेपचुन तुमच्या पत्रिकेत कसा आहे तो तुम्हाला कशी फळे देईल हे सांगण खुप अवघड असतं . कारण नेपचुन हा अतिशय गुढ ग्रह आहे. तो केवळ चंद्राबरोबरच काम करतो असे नाही. तर तो तुमच्या पत्रिकेत प्रत्येक ग्रहाबरोबर काम करतो. जसे मंगळाबरोबर असेल तर माणसाच्या आतमधले रागाचे आवेग उठत राहतात. पण माणसाला ते कळत नाही की हे रागाचे आवेग मला का येत राहतात. पण तो राग त्याच्या अंतर्मनातुन प्रगट होत असतो. मग तो त्याच्या बहिर्मनात येउन त्याच्या शरीरावर तो परिणाम करतो. तर असा हा नेपचुन तुमच्या पत्रिकेत कसा आहे याचा खोल विचार करा आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा करुन घेता येईल आणि तुम्हाला कसे पुढे जाता येईल याचा तुम्ही विचार करा

धन्यवाद.

☀️Vedic Astrology by Amol Joshi ☀️

22 वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवाने, तुमच्या प्रश्नांचे निरसन अगदी तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळे पर्यंत करणार आहे.

Consultation चार्जेस खालील प्रमाणे :
कुंडली Analysis – 500/- Per Session per कुंडली/पत्रिका

For Appointment –
Amol Joshi +91 83294 54656

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

× Consult Us !