मित्रांनो हा ग्रह १००% नास्तिक आहे . म्हणजे हा ग्रह देवाला मानीत नाही. हा ग्रह आपल्या आजुबाजुला कोणते चिकित्सक मनोवृत्तिचे लोक असतील शास्रज्ञ असतील . तर अशा लोकांच्या पत्रिकेत हर्षल हा खुप चांगल्या ठिकाणी असतो.

नमस्कार मित्रांनो 🙏🏼
आज आपण हर्षल या ग्रहाविषयी काही गोष्टी बोलणार आहोत. मित्रांनो हर्षल, नेपचुन, प्लुटो या ग्रहांविषयी सामान्यतः ज्योतिषी लोकं फार काही सांगत नाहीत. याच कारण या तिन्ही ग्रहांची समीकरणे सोडवण हे अतिशय किचकट असतं. आता आपण हर्षलकडे वळुयात . हर्षल हा ग्रह जो आहे हा अतिशय तापट शीघ्रकोपी परंतु त्याचबरोबर अतिशय संयमी आहे. मित्रांनो हा ग्रह १००% नास्तिक आहे . म्हणजे हा ग्रह देवाला मानीत नाही. हा ग्रह आपल्या आजुबाजुला कोणते चिकित्सक मनोवृत्तिचे लोक असतील शास्रज्ञ असतील . तर अशा लोकांच्या पत्रिकेत हर्षल हा खुप चांगल्या ठिकाणी असतो.

मित्रांनो हर्षलमधे मंगळाची क्रूरता / तापटपणा आहे त्याचबरोबर त्यामधे शनीचा संयमीपणा पण आहे.
मित्रांनो हर्षल हा अतिशय संथ गतिने चालणारा ग्रह आहे. तो संथ गतीने चालत असला तरी त्याची परिणाम कारकता ही अतिशय भेदक असु शकते.
हर्षल हा जसे रुढीबाह्य वर्तन करतो , नवनविन शोध लावतो तसाच तो मोठ्या प्रमाणावर जीवितहानी देखिल करु शकतो.
मित्रांनो हर्षल म्हणजे खुप मोठ्या प्रमाणात होणारे स्फोट , अचानक होणार्या दूर्घटना याचं देखिल कारकत्व हर्षल कडे आहे.
त्याचप्रमाणे हर्षल हा ग्रह अतिशय संयमी देखिल आहे. म्हणजे एखाद्याच्या पत्रिकेत लग्न स्थानामधे तुळेचा हर्षल असेल तर तो माणुस खुप हुशार असतो. तितकाच तो संयमी देखिल असतो.
मित्रांनो हर्षल ज्या पत्रिकेत चांगला असतो त्या माणसाची immunity / रोगप्रतिकारक्षमता देखिल खुप चांगली असते . परंतु ही माणसं काहीशा प्रमाणात आडमुठी देखिल असतात .
तर असा हा हर्षल तुमच्या पत्रिकेत कुठं आहे हे बघा व त्याचा फायदा करुन घ्या .
🙏🏼 धन्यवाद 🙏🏼
श्री अमोल जोशी
8329454656
