गुरु शुक्र युती शुभ की अशुभ ?

हे दोन ग्रह कित्येकदा मजेशीर अनुभव देताना दिसतात.
Guru Shukra Yuti Effects

॥ श्री ॥
नमस्कार मित्रांनो.

गुरु शुक्र युती शुभ की अशुभ?

आज आपण दोन विरुद्ध अशा शुभ ग्रहांची युती काय काम करते ते बघणार आहोत.
गुरु हा परमार्थ सुखाचा कारक आहे तर शुक्र हा ऐहिक सुखाचा कारक आहे. दोन्हीही गोष्टी परिपुर्ण मानवी जीवनासाठी आवश्यक असतात.
परंतु हे दोन ग्रह कित्येकदा मजेशीर अनुभव देताना दिसतात. व्यवसाय धंद्यामधे तसेच वैवाहिक सौख्यामधे आणि मानसिक परिस्थितीमधे या दोन ग्रहांच्या युतीचे परिणाम बघायला मिळतात.
व्यवसाय धंद्यामधे निर्णय घेताना खुप द्विधा मनःस्थिती बघावयास मिळते.
एखाद्या नातेवाईकांशी जर या लोकांचे व्यवहार झाले तर बर्‍याच अंशी या लोकांचे पैसे बुडण्याचीच शक्यता जास्त असते.
अशा व्यक्तिंचे विवाह जुळताना खुपदा अडचणी येताना दिसतात. खुपदा यांचे विवाह उशीरा होताना दिसतात.
आयुष्यात एखादा मोठा निर्णय घेताना देखिल यांची खुप जास्त द्विधा मनःस्थिती होते.
हे सगळे असतानाही ही व्यक्ती समाजामधे उत्तम माणुस म्हणुन नाव कमावते.
(टीप— वर दिलेल्या गोष्टी या ग्रहांच्या राशी आणि स्थानाप्रमाणे बदलु शकतात.)

धन्यवाद
🙏🙏🙏
श्री अमोल जोशी
8329454656

www.shreevidyajyotish.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

× Consult Us !