राहु म्हटलं की डोळ्यासमोर एक राक्षसी चेहरा येतो. खरच राहु इतका वाईट आहे का?

नमस्कार मित्रांनो.
राहु म्हटलं की डोळ्यासमोर एक राक्षसी चेहरा येतो. खरच राहु इतका वाईट आहे का?
कलियुग हे प्रामुख्याने चंगळवादी किंवा भोगवादी सांगीतलेले आहे. या युगात धर्म संपूर्णपणे लोप पावतो आणि मग माणुस स्वतःच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पाशवी बळाचा वापर करतो.
राहू मधे अचानकच खुप मोठ्या प्रमाणावर पैसा देण्याची ताकद असते. तो पैसा देत असताना धर्म अधर्म , चांगले वाईट याचा विचार राहू करत नाही. माणुस अंधाधुंदपणे या संपत्तिचा उपभोग घेतो. उपभोग घेत असताना माणसाला स्वर्ग सुखाची अनुभुती होते.
पण कित्येकदा असे निदर्शनास आले आहे की पुढे जाउन हाच राहू माणसाला भिकेला देखिल लावतो, विविध आजार देतो, अनन्वित दूःखे देतो, काहीवेळेला तुरुंगवास देखिल देतो.
आता तुम्हीच ठरवा हा राहु चांगला की वाईट?
ज्या प्रमाणे युरेनियम पासुन मोठ्या प्रमाणावर विद्युतनिर्मिती करता येते त्याचप्रमाणे अणुबॉंबदेखिल बनवता येतो. असाच राहू आहे. ज्याचा उपयोग चांगल्या कामांसाठीही करता येतो आणि वाईट कामांसाठीही करता येतो. आता याचा उपयोग ज्याने त्याने कसा करावा हा ज्याचा त्याचा विषय आहे.
धन्यवाद
🙏🙏🙏
श्री अमोल जोशी
8329454656
